बाळू मामांना ठार मारण्याचा प्रयत्न कोणी केला? बाळू मामांचा तळ ठिकभुर्ली भागात होता. स्वतः मामा सुमारे चारशे बकरी घेऊन चारण्यास जात असत. त्या भागातील दोन दरडेखोरांनी मामांच्या तळाचं निरीक्षण केलं. त्यांच्या मनात आलं, या धंगरासोबत कोणी गडी नाहीत, हा एकटाच आहे. याला ठार मारलं तर सगळ्या मेंढ्या आपल्याला ऐत्याच मिळतील. दरडेखोरांनी योजना आखली आणि योग्य संधीची ते वाट पाहू लागले. ते सतत बाळू मामांच्या मागावर राहिले.
एक दिवस एका डोंगराच्या पायथ्याला मेंढ्या पाहत मामा बसले होते. डोंगराच्या वरिल बाजूस त्यांचं लक्ष नव्हतं. मामा बसलेल्या वरिल बाजूस एक भला मोठा दगड होता. तो दगड वरून ढकलला तर मामा चेंगरून मरतील, असा दरडेखोरांनी विचार केला आणि तो दगड खाली ढकलून दिला. तो चेंडूसारखा गोल दगड वाढत्या वेगानं घसरू लागला. मामांच्या अंगावर जाणारच तेवढ्यात चमत्कार झाला. मामांपासून अगदी काही अंतरावरच त्या दगडाचे अकस्मात दोन तुकडे झाले. बाळू मामांच्या उजव्या बाजूस एक तुकडा गेला तर डाव्या बाजूस एक तुकडा गेला. मामा सुरक्षित राहिले. ते पाहून दरडेकोरांनी घाबरून पलायन केलं.
या दरडेखोरांचं पुढं काय झालं ते आपण पुढे एखाद्या भागात नक्की पाहू.
बोला बोला बोला बाळू मामांच्या नावानं जांघ भलं. मंडळी, आम्ही बाळू मामांची महती सांगणारे वीडियो बनवत आहोत. विनंती आहे, वीडियो शक्य तितके जरूर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सब्सक्राइब करा. बोला बोला बोला बाळू मामांच्या नावानं जांघ भलं.