नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या घरातून अचानकपणे पैसे जाऊ लागतो. सगळं काही चांगलं चाललेलं असतं आणि अचानक घरातील एखादा सदस्य आजारी पडतो आणि त्याच्या आजारपणावरती बरेचसे पैसे खर्च होतात. मित्रांनो, आपण बचत करण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो मात्र पैसे वाचवता येत नाहीत. जेवढं आपलं इन्कम असतं त्यापेक्षा जास्त खर्चच वाढतात. मित्रांनो, या पाठीमागे आपल्या हातून होणाऱ्या लहान-लहान चुका असतात. आपल्याला वाटतं हे अचानकपणे होऊ लागलं आहे मात्र लक्षात घ्या हे अचानक होत नसतं. आपण दीर्घकाळ आपल्या हातून ज्या चुका होत असतात याच चुका यासाठी कारणीभूत असतात. आज आपण पाहणार आहोत की या अशा कोणत्या चुका आहेत ज्यांनी त्या चुका आपल्याला कशा प्रकारे टाळता येतील त्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा करता येतील जेणेकरून आपल्या पैशांची हानी होणार नाही पैशांची बचत होईल.
मित्रांनो जी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे झाडूशी संबंधित. आपण आपल्या घरामध्ये जो झाडू ठेवत आहे ही झाडू ठेवण्याची जागा ही आपल्या मौल्यवान वस्तूंपासून जवळ नसावी. म्हणजेच आपलं कपाट असेल किंवा आपल्या घरातले आपला कॅश बॉक्स असेल, तिजोरी असेल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवत आहे अशा ठिकाणी झाडू ठेवू नका. अशा ठिकाणी झाडू ठेवल्याने प्रचंड प्रमाणात धनहानी होते त्या घरातून पैसा बाहेर पडतो.
मित्रांनो दुसरी गोष्ट जर तुमच्या घरामध्ये लोक वारंवार आजारी पडत असतील अचानकपणे आजारी पडतात काहीही कारण नसताना तर कदाचित तुम्ही तुमच्या किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये वास्तुशास्त्रानुसार आपण औषधं ठेवू नयेत. औषधं आपल्या किचनमध्ये जर आपण ठेवली तर मित्रांनो त्याचा खूप वाईट परिणाम हा आपल्या घरातील लोकांच्या स्वास्थ्यावर त्यांच्या आरोग्यावर पडत असतो.
मित्रांनो बऱ्याचशा घरांमध्ये लहान मुलं असतात आणि ती फरशीवर म्हणा किंवा भिंतीवर पेनने पेंसिलने किंवा चॉकने खडूने रेषा ओढतात. मित्रांनो ह्या ज्या रेषा आहेत या रेषा तुमच्या घरातून पैसा बाहेर काढतात. तुमच्या घरातले खर्च वाढतात. उधारीमध्ये वाढ होते तर ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी.
मित्रांनो टॉयलेट आणि बाथरूमशी संबंधित काही गोष्टी लक्षात घ्या की यांचा जो दरवाजा आहे टॉयलेटचा दरवाजा आणि बाथरूमचा दरवाजा वास्तुशास्त्र असं मानतं की यांचे दरवाजे हे नेहमी आपण बंद ठेवायला हवेत. कारण हे दरवाजे जर उघडे राहत असतील तर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आपला हॉल असेल, बेडरूम असेल ज्याच्या ठिकाणी आपण आपल्या धन साठवलेलं आहे पैसा साठवला आहे त्या ठिकाणी ही ऊर्जा जाऊन पोहोचते आणि मग या पैशांची हानी होते. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तर समस्या येतीलच मात्र व्यावसायिक ज्या काही गोष्टी आहेत म्हणजेच तुमचा उद्योग असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल ज्या ठिकाणाहून तुम्हाला पैसा येतो आहे त्यावरती याचा खूप मोठा निगेटिव्ह परिणाम होतो. तसंच मित्रांनो याचे जे दरवाजे आहेत हे दरवाजे उघडताना आणि लावताना करकर किंवा मोठा असा आवाज येणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यायला हवी.
मित्रांनो बऱ्याच जणांना घरामध्ये वेगवेगळे शोपीस लावण्याची सवय असते. मुर्ती वगैरे लावतात तर अशा मुर्ती किंवा असे शोपीस की ज्या पाण्याशी संबंधित आहे पाणी वॉटर तर वास्तुशास्त्र असं मानतं की घराच्या दक्षिण दिशेला आपण कधीही पाण्याशी संबंधित मुर्ती किंवा शोपीस ठेवू नयेत. यामुळे इन्कमपेक्षा खर्च जास्त वाढतो. म्हणजे तुमची जी आय आहे जे तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे उत्पन्नापेक्षा खर्चामध्ये वाढ होते.
मित्रांनो तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही शक्यतो कोणत्याही देवी-देवतांच्या मुर्ती ठेवू नका. हा तुमच्या पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्यामध्ये तुमच्यातील प्रेमामध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही राधाकृष्ण यांची मुर्ती किंवा फोटो ठेवू शकता. मात्र इतर देवी-देवतांच्या फोटो ठेवता येत नाहीत आणि हनुमानांची श्री हनुमानांची मुर्ती तर किंवा फोटो आपण बेडरूममध्ये चुकूनही लावू नका. यामुळे वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. घरामध्ये अशांती पसरते.
मित्रांनो आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे लक्षात घ्या आपल्या घराचा ईशान्य जो कोपरा आहे म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांचा मधला जो कोपरा आहे तर वास्तुशास्त्र असं मानतं की हा कोपरा हा ईशान्य कोपरा आपण नेहमी स्वच्छठेवायला हवा. या ठिकाणी जर अस्वच्छता असेल घाण असेल तर मित्रांनो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावर नाराज होतात. आणि मग आपल्या घरातून माता लक्ष्मी टिकत नाही आपल्या घरामध्ये. ते आपल्या घरामध्ये वास्तव्य करत नाही. धनसंचय कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही. तुम्ही कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, पैसा वाचवता येत नाही.
मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या अंगणात समोर वेगवेगळ्या प्रकारची रोप लावण्याची आवड असेल तुम्ही झाडं जर लावत असाल तर काटेदार जी झाडं आहेत किंवा जी विषारी झाडं आहेत अशी झाडं लावू नका. वास्तुशास्त्र असं मानतं की अशा प्रकारची झाडं लावल्याने घरामध्ये अशांती पसरते. अशांतीचं वातावरण पसरतं. घरातील लोकांची मानसिक स्थिती योग्य राहत नाही. आणि त्यामुळेच आपल्या अशा घरामध्ये की ज्या ठिकाणी लोक एकमेकांशी भांडतात, वैरभावाने वागतात, माता लक्ष्मी त्या घरात कधीच स्थिर होत नाही.
तर याविषयीचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी ओन्ली मराठी आणि रिअल मराठी या दोन्हीही चॅनलवरती पब्लिश केलेला आहे. आपण त्याचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो अशा काही गोष्टींचं जर आपण पालन केलंत या गोष्टींवर जर लक्ष दिलंत आणि त्यामध्ये जर सुधारणा केल्यात तर तुम्हालाही दिसेल की तुमच्या घरामध्ये पैसा टिकू लागेल. जे अशांतीचं वातावरण आहे, अस्थैर्य आहे घरामध्ये, ते सुद्धा अगदी व्यवस्थित होऊन जाईल.