
मित्रांनो, प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी उपवास, व्रत-वैकल्य आणि प्रार्थना करत असते. शास्त्रानुसार दागिने हे स्त्रीच्या सौंदर्याचे तसेच समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने दागिने परिधान केल्यास त्याचा विपरीत परिणाम पतीच्या आरोग्यावर व प्रगतीवर होतो, असे मानले जाते.
आजकाल अनेक स्त्रिया फॅशननुसार दागिने वापरताना दिसतात. पण शास्त्राच्या दृष्टीने हे योग्य नाही. हिंदू संस्कृतीत प्रत्येक दागिन्याला व प्रत्येक पोशाखाला विशिष्ट महत्व दिले गेले आहे. मात्र आजच्या धावपळीच्या युगात त्याकडे फार थोडे लोक लक्ष देतात.
शास्त्रानुसार टाळाव्यात अशा काही गोष्टी
पांढरी साडी: विवाहित महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी परिधान करू नये. असे मानले जाते की यामुळे त्यांचा पुण्यधर्म कमी होतो आणि वैवाहिक जीवनात नकारात्मकता वाढते.
सोन्याचे पैंजण: पायात सोन्याचे दागिने घालणे हे अशुभ मानले जाते. यामुळे कुबेरदेव नाराज होतात आणि घरात दरिद्री येऊ शकते, उत्पन्नात अडथळे निर्माण होतात. म्हणून पायात चांदीचे दागिने घालणेच उत्तम.
काळ्या बांगड्या: सुवासिनी स्त्रियांनी काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत. असे मानले जाते की त्यामुळे शनिदेवांचा प्रकोप होतो व वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो.
मंगळसूत्र: विवाहित स्त्रीने मंगळसूत्र कधीही काढू नये. हे पतीच्या आयुष्याशी जोडलेले प्रतीक मानले गेले आहे.
निष्कर्ष:- विवाहित महिलांनी फॅशन करताना संस्कृतीची जपणूक करणे आवश्यक आहे. चुकीचे दागिने परिधान केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात, असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.
टीप: वरील माहिती ही धार्मिक आणि पुराणांतील मान्यतेवर आधारित आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. याची सत्यता किंवा असत्यता याबाबत कोणताही दावा केलेला नाही.